जयसिंगपूर / प्रतिनिधी
हेरवाड (ता. शिरोळ) येथे खुल्या हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धेत पॉप्युलर स्पोर्टस् संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला ११ हजार रुपये व विजयी चषक देवून गौरविण्यात आले. तर साईराज स्पोर्टस् संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक शाहूराज स्पोर्टस्, चतुर्थ क्रमांक युवा स्पोर्टस् संघाला मिळाला.
साईराज स्पोर्टस् संघाच्यावतीने हेरवाड येथील कुमार विद्यामंदिरसमोरील क्रिडांगणावर खुल्या डे-नाईट हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात पॉप्युलर स्पोर्टस् संघाने प्रथम फलंदाजी करताना ४६ धावा केल्या. प्रत्युत्तर साईराज स्पोर्टस् ? संघ २८ धावाच करु शकला. त्यामुळे १८ धावांनी पॉप्युलर संघाने विजय मिळविला. सामनावीर जितेंद्र मधाळे तर मालिकावीर क्रांतीवीर पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खेळाडू, ग्रामस्थ उपस्थित होते.

