कोल्हापूर / प्रतिनिधी
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला जाहीर करण्यात आलेला ‘स्पेशल कॅटेगरी कन्सस्टन्सी परफॉर्मन्स अॅवॉर्ड’ को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. स्पेशल कॅटेगरी कन्सस्टन्सी परफॉर्मन्स अॅवॉर्ड या विभागातून कारखान्याला हे पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक वितरण झाले.
कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ व जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संयोजक संजय खटाळ, जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बी. ए. पाटील यांना व्यवस्थापकीय विभागातून ‘बेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला आतापर्यंत को-जनरेशनमध्ये केंद्रीय पातळीवर तसेच मेडाकडून गेल्या दहा वर्षांत पाच पारितोषिके मिळाली आहेत. या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला, असे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले.

