खणीत बुडून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर / प्रतिनिधी

रंकाळा तलाव परिसरातील पतोडी खण येथे पाण्यात बुडवून १४ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. शिव नविन पटेल (पाटीदार भवन, टिंबर मार्केट) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, टिंबर मार्केट येथील नवीन पटेल यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. पत्नी, मुलगी विधी आणि लहान मुलगा शिव यांच्यासह ते टिंबर मार्केट येथील पाटीदार भवनजवळ राहतात. शिव हा सानेगुरुजी वसाहत परिसरातील एका हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची वार्षिक परीक्षेचा सुरु होते. त्याचे वडील त्याला रोज शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जात होते. आज त्याचा शेवटचा पेपर असल्याने त्याचे वडील सकाळी त्याला शाळेत सोडून घरी गेले होते. ते साडेआकरा वाजण्याच्या सुमारास पेपर सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी = घेण्यासाठी गेले असता. पंधरा मिनिटात मित्रांसोबत खेळून घरी येतो, असे सांगून तो मित्रांबरोबर खेळायला गेला.
दरम्यान शिव हा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत रंकाळा परिसरातील पतोडी खण येथे पोहण्यासाठी गेला असता, पोहताना तो अचानक पाण्यात बुडाला. त्यावेळी परिसरात अन्य कोणीही – नसल्याने त्याच्या मित्रांनी घडलेली घटना ही त्याच्या घरी जाऊन वडिलांना सांगितली. या घटनेची माहिती त्याच्या वडिलांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सागर मोरे, ऋषिकेश ठाणेकर, वैभव अतिग्रे आणि उदय काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर अग्निशामन विभागाला पाचारण केले. त्यांनी दोन तास शोध मोहीम राबवून, बुडालेल्या शिव याचा मृतदेह शोधून काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी सीपीआर येथे हलविण्यात आला.
शिव पटेल याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजतात पटेल यांच्या नातेवाईकांनी सीपीआर परिसरात गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई-वडील मोठी बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात झाली आहे.

Scroll to Top