इचलकरंजी / प्रतिनिधी
दक्षिण भारत जैन सभेच्या येथील दिगंबर जैन बोर्डिंग च्या आवारात असलेल्या श्री १००८ चंद्रप्रभ तीर्थंकर जीन मंदिरात पंचकल्याण प्रतिष्ठा व विश्वशांती महायज्ञ महामहोत्सवास ध्वजारोहण मंडप उद्घाटन, हत्तीवरून भव्य जलकुंभमिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाले.
सकाळी नांदी मंगल व मंगलवाद्य घोष झाल्यानंतर सौधर्म इंद्राणी सौ सुरागी व आदित्य तेरदाळे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिर व मंडपासमोरील ध्वजारोहण मंडप उद्घाटन डॉ. सौ अर्चना व आशुतोष बाळासाहेब लांडे तर मंडप उद्घाटन व दीप प्रज्वलन डॉ. बाळासाहेब लांडे यांच्या हस्ते झाले. मंगल कलश स्थापना अंकिता व सौरभ सुहास हाळे यांच्या हस्ते तर मंडप विधी जिनबिंब स्थापना तृप्ती व सम्मेद अशोक मगदूम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आचार्यांना निमंत्रण देण्यात आले. सकाळी परिसरातून हत्तीवरून भव्य जलकुंभ मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी हत्तीवरून जलकुंभ आणण्याचा मान सुमेधा व प्रतिक रवींद्र पाटील यांना मिळाला. पंचामृत अभिषेक महा शांतीधारा मंदिर व वेदिक शुद्धी असे कार्यक्रम पार पडले. दुपारी उपस्थित आचार्य श्रींचे मंगल प्रवचन झाले. यावेळी दिगंबर जैन बोर्डिंग स्थापनेपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी हत्तीवरून परिसरातून ध्वजपीठ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रात्री दिपोत्सव मंगल आरती गर्भ कल्याण पूर्वार्ध असे कार्यक्रम झाले. संगीत आरतीने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची समाप्ती झाली.
हा सोहळा आचार्यत्न बाहुबली मुनी महाराज यांचे परमशिष्य आचार्य १०८ श्री जीनसेन मुनी महाराज व क्षुल्लकरत्न परमपूज्य श्री १०५ समर्पण सागर महाराज श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या पावन उपस्थितीत होत आहे. हा महोत्सव प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ. सम्मेद उपाध्ये साजणी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.

