जोतिबा डोंगर / प्रतिनिधी
रेवदंडा (ता. आलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र जोतिबा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्य रस्ते व पायरी मार्ग, तसेच सर्व पार्किंग व गावभागाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रतिष्ठानचे १,२६८ स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी ३८ टन इतका आला. कचरा गोळा करण्यात तसेच प्रतिष्ठानतर्फे श्रीक्षेत्र जोतिबा येथे २ हजार वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांचे संगोपन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.
यावेळी शुभलक्ष्मी विनय कोरे, विनीता जयंत पाटील, पन्हाळा पंचायत समितीच्या माजी सभापती गीता पाटील, जि.प. माजी सदस्य शिवाजी मोरे, तहसीलदार माधुरी शिंदे जाधव, सोनाली माडकर आदी उपस्थित होते.

