शिरटी येथे भैरेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

मानवी जीवनात पुण्य मिळविण्यासाठी गावात होणाऱ्या जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे आपला धर्म सांगतो, असे प्रतिपादन करवीर पिठाचे पिठाधीपती जगद्‌गुरू विद्यानृसिंह भारती प. पू. शंकराचार्य स्वामी यांनी केले.
येथील ग्रामदैवत भैरेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा त्यांच्या उपस्थितीत झाला. जगद्‌गुरू विद्यानृसिंह भारती प. पू. शंकराचार्य स्वामी यांची रथातून आणि सवालधारकांची कलशधारी सुवासिनी महिला, घोडे, बँड, हलगी, धनगरी ढोल या पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. उल्हास चौगुले, छाया कुंभार चनगोंडा पाटील, बाहुबली पाटील, सुनील गतारे, जितेंद्र कांबळे, सुहास चौगुले यांच्या परिवारामार्फत देणगी देण्यात आली. यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, भैरेश्वर मंदिर कलशारोहण समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि मंदिराचे पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top