कै. रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

इचलकरंजी / प्रतिनिधी

चाणक्य प्रतिष्ठान व श्री आर्य चाणक्य पत संस्था, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली जाते. चालू वर्षी ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला गुरुवारी १७ एप्रिल ते शनिवारी १९ एप्रिलपर्यंत असणार आहे.
या व्याख्यानमालेसाठी १७रोजी डॉ. अमर आडके, कोल्हापूर हे शिवपुत्र संभाजी राजे या विषयावर, १८ रोजी डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे जागतिक अर्थकरणाची बदलती समीकरणे व भारत या विषयावर तर १९ रोजी अॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांचे भारताचे संविधान आणि समान नागरी कायदा या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सदरची व्याख्यानमाला इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. तरी रसिकांनी या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चाणक्य प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष पंकज मेहता यांनी केले आहे.

Scroll to Top