चंदूर / प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चंदूर मध्ये विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे प्रतिमापूजन सरपंच स्नेहल कांबळे व सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुष्पहार अर्पण उपसरपंच फिरोज शेख व माजी तंटामुक्त अध्यक्ष आप्पासो पाटील यांनी केले. तसेच भीम
ज्योतीचे स्वागत हातकणंगले पं. समितीचे माजी सभापती महेश पाटील यांनी केले. यावेळी संजय जिंदे, भाऊसो रेंदाळे, मारुती पुजारी, संदीप कांबळे, बाबासो मंगसुळे, वैशाली पाटील, ललिता पुजारी, स्वाती कदम, योगिता हळदे, ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे, कुमार कांबळे, बाबासाहेब पाटील, सचिन हळदे, सुधाकर कदम, बसवराज पाटील, बाळासो कांबळे, विजय कांबळे, श्रीकांत धनवडे शंकर माने, भाऊसो पाटील, शिवाजी पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते. गावभागातील तसेच माळभागा वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हातकणंगले पं. स माजी सभापती महेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. विद्यार्थी युवक ग्रंथालय मध्ये प्रतिमापूजन बालवाचक अक्षय मंगसुळे यांनी केले.
यावेळी अध्यक्ष विजयकुमार पाटील, जगोंडा पाटील, सचिव प्रवीण पाटील, सागर माळी, विठोबा पाटील व लिपिक सचिन पाटील, विद्यार्थी व वाचक उपस्थित होते. उदय सार्वजनिक वाचनालयामध्ये प्रतिमापूजन दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केले. यावेळी संचालक वाचक व ग्रंथपाल विलास पाटील उपस्थित होते.

