नंदादीप नेत्रालयाच्या चष्मामुक्ती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील नंदादीप नेत्रालयाच्या वतीने १ एप्रिल ते ३१ मेदरम्यान चष्मा घालवण्याच्या सर्व शस्त्रक्रियेवर भरघोस सूट देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत होणाऱ्या उपचारांना लग्न कार्य किंवा नोकरीत चष्म्याची अडचण होत असलेल्या असंख्य युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सध्या कमी वयापासून चष्मा लागत आहे. सरकारी नोकरी, सैन्य भरती, आंतरराष्ट्रीय जॉब ऑफर अशा नोकरीच्या ठिकाणी चष्मा असलेल्यांना प्राधान्य दिले जात नाही. मोठ्या नंबरच्या चष्म्यामुळे काही मुला मुलींच्या लग्नातही अडथळे येतात. यामुळे नंदादीप नेत्रालयामध्ये असंख्यांना चष्म्यापासून मुक्त केले जात आहे. शिवाय या शस्त्रक्रियांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी नंदादीपकडून सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करण्यासाठी ईएमआयचा देखील पर्याय दिला जात आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत कुशल डॉक्टर तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्यंत आधुनिक आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून होत असल्याने १५ ते २० मिनिटांत या शस्त्रक्रिया पार पडतात. ५ हजारांच्या पूर्व-शस्त्रक्रिया तपासणी देखील मोफत आहे. याचा लाभघ्यावा, असे आवाहन केले आहे.

Scroll to Top