इचलकरंजी / प्रतिनिधी
सांगलीतील १९२ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीच्या इचलकरंजी शाखेचा ७ वा वर्धापन दिन आणि रामनवमी याचे औचित्य साधत गुरुवारी ‘गीत रामायण’ कार्यक्रम श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पार पडला.
गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या उत्स्फूर्त लेखणीतून साकारलेले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीताने ‘गीत रामायण’ अजरामर झाले आहे. महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे, गजानन महाजन गुरुजी, पीएनजीचे संचालक मिलिंद PNG गाडगीळ, सिद्धार्थ गाडगीळ, हिमगौरी गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर सांगलीच्या स्वरवैभव क्रिएशन्सच्या कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. श्रीरंग जोशी, सुकृत ताम्हनकर, कीर्ती पेठे या गायकांनी गीत रामायणातील गाणी सादर करताना प्रेक्षक भारावून जात होते. त्यांना भास्कर पेठे, अविनाश इनामदार, परेश पेठे, कृष्णा साठे, अक्षय कुलकर्णी यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन शशांक लिमये यांनी केल. परेश पेठे हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजक व निर्माता होते. यावेळी इचलकरंजी शाखा व्यवस्थापक सुमित कुलकर्णी, आदर्श हुपरीकर, मार्केटिंग विभागाचे महेंद्र कालेकर यांच्यासह शाखेचा स्टाफ उपस्थित होता.

