निपाणी / प्रतिनिधी
बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी होऊन चालक जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सीपीआय ऑफिस जवळ घडली. चालकाचे नाव मदन. एस असे आहे.
कंटेनर चालक कंटेनर घेऊन बेळगावहूनन कोल्हापूरच्या दिशेने जात असताना भरधाव कंटेनर वरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टैंकर तीन वेळा पलटी झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

