इचलकरंजी / प्रतिनिधी
शहापूरचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाची यात्रा मंगळवार, दि. १ एप्रिल पासून सुरू होत आहे. यात्रेच्या अनुषंगाने १ ते ५ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
नवसाला पावणारा देव म्हणून शहापूरच्या श्री म्हसोबा देवाची ख्याती आहे. यात्रेच्या अनुषंगाने खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, विविध वस्तूंचे स्टॉल सजले आहेत. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे अभिषेक व दंडवताचा कार्यक्रम, दुपारी १२ वाजता श्री म्हसोबा देवाच्या पालखीची मिरवणूक व नैवेद्य, सायंकाळी महानैवेद्य, मध्यरात्री आतषबाजी होणार आहे.

