इचलकरंजी/ प्रतिनिधी
इचलकरंजी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या झालेल्या संयुक्त बैठकीत अशंतः मोटार ट्रेनिंगच्या फी मध्ये वाढ करण्यात आली आहे अशी माहिती मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप हिंगे यांनी दिली.
बैठकीत अनेक गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर व मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनची २०१९ पासून फी मध्ये कोणत्याही प्रकारची दर वाढ झाली नाही. आजची परिस्थिती पाहता गाड्यांचा मेंटेनन्स, पेट्रोल दरवाढ, वाढती महागाई, कामगारांचा पगार या सर्व गोष्टींचा विचार करून १ एप्रिल २०२५ पासून मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने सर्व प्रकारच्या मोटार ट्रेनिंग फी मध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्याचे घोषित केले आहे. हि फी वाढ इचलकरंजी मधील सर्व ट्रेनिंग स्कूल यांना लागू राहील असा ठराव करण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्ष प्रदीप हिंगे, उपाध्यक्ष अनिल महाबळे, सेक्रेटरी अमोल कोळेकर व अप्पा रावळ यांनी मनोगत व्यक्त केले व ठरावास मंजुरी दिली. बैठकीस प्रदीप कनोजे, उमेश पसारे, श्री. लडगे, विनायक माळी यांच्यासह इचलकरंजीतील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक चालक उपस्थित होते.
