इचलकरंजीत नागरी प्रश्नांबाबत आयुक्तांना निवेदन

इचलकरंजी / प्रतिनिधी

कमला नेहरू गृहनिर्माण संस्था आणि परिसरातील नागरी प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, या मागणीचे निवेदन सजग नागरिक मंचच्या वतीने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले. अति. आयुक्त सुषमा शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.
गेल्या सहा महिन्यांपासून कमला नेहरू दररोज रस्ते आणि गटारींची स्वच्छता करण्याची आवश्यकताआहे. खराब रस्ते तत्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करावे, भुयारी गटार योजनेला घरगुती जोडणी करून द्यावी, कमला नेहरू बागेतील मुलांच्या खेळाचे साहित्य दुरुस्त करावीत, वॉर्ड क्र. १९ मध्ये सफाई कामगार वाढवून द्यावेत, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. शिष्टमंडळात ए. बी. पाटील, अवधूत अडके, सुभाष पाटील, छाया पाटील आदींचा समावेश होता.

Scroll to Top