कोल्हापूर / प्रतिनिधी
एक लडकी को देखा तो… दिल तो है दिल…, आपके आखों में कुछ…, ये शाम मस्तानी…, ये समा… अशा एकापेक्षा एक सदाबहार – गीतांना डॉक्टर गायकांनी स्वरसाज चढवला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या केएमए आर्ट सर्कल आणि केएमए कराओके क्लबच्या वतीने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या कराओके ट्रॅकवरील संगीत स्वर मैफलीचे आयोजन गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात करण्यात आले होते. या सांगीतिक कार्यक्रमास कोल्हापूरच्या रसिकांनी भरभरून दाद दिली.
या कराओके शो मध्ये कोल्हापुरात प्रथमच १६ फूट बाय १० फूट एलईडी स्क्रीनवर मूळ गाण्यांची चित्रफीत लावण्यात आली होती. त्याला डॉक्टर गायक पार्श्वगायन करत होते. यामध्ये डॉ. उन्नती सबनीस, डॉ. सचिन व डॉ. दीपा फिरके, डॉ. संजय घोटणे, डॉ. संगीता निंबाळकर, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. प्रिया शहा, बीना अपराध, डॉ. पी. एम. चौगुले डॉ. रेणू आडनाईक, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. अनघा कुलकर्णी, डॉ अरुण व डॉ. अनिता परीतेकर, डॉ. मिलिंद तिवले, डॉ. मनीषा कुलकर्णी, डॉ. मंदार पाटील, डॉ. शिरीष व अनिता पाटील, डॉ. महेंद्र व डॉ. वैशाली कानडे, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. चित्तरंजन कदम, डॉ. अनिता सोनवणे, सौ. प्रीती चिंचणीकर, डॉ. शीतल पाटील, डॉ. मैना शिंदे, डॉ. सुहास कोठावळे यांच्यासह डॉक्टर कलाकारांनी मंत्रमुग्ध करणारी गीते गायली.
डॉ. गीता पिल्लाई, डॉ. दीपा फिरके, डॉ. मंजिरी वायचळ, डॉ. रूपाली दळवी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी केएमए आर्ट सर्कल व केएमए कराओके क्लबचे प्रमुख डॉ. राजेंद्र वायचळ, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर व आर्ट सर्कल समन्वयक डॉ. आबासाहेब शिर्के, सचिव डॉ. शीतल देसाई, खजानीस डॉ. अरुण धुमाळे, डॉ. पी. एम. चौगुले, डॉ. संजय घोटणे यांच्यासह डॉक्टर्स उपस्थित होते.

