‘नॉरिशिंग कॅफे’ चे उद्घाटन

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापुरात नागाळा पार्क येथे ‘नॉरिशिंग फार्म्स कॅफे’चा शुभारंभ फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांच्या हस्ते झाला. अत्याधुनिक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे पिकवलेल्या ताज्या, रसायनमुक्त भाज्यांपासून तयार होणारे आरोग्यदायी अन्न ही या कॅफेची खासियत आहे. दिवाकर बेडेकर यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या कॅफेमुळे कोल्हापूरच्या फूड सीनमध्ये स्मार्ट आणि हेल्दी खाण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. ‘ताजं, नैसर्गिक अन्न म्हणजेच आरोग्याची खरी गुरुकिल्ली’, असे मिलिंद सोमण म्हणाले. फिटनेसप्रेमींसाठी ही एक प्रेरणादायी सुरुवात ठरली आहे. यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top