चिपरी (ता.शिरोळ) येथील कुरुंदवाड परीसर वगळता शिरोळ तालुक्याला विज पुरवठा करणारे 110 केव्हीचे उपकेंद्र आहे. 2000 सालापासून आजपर्यत तब्बल 61 लाख 6 हजार रूपयांचा कर महापारेषण विभागाने भरलेला नाही. वारवांर कर भरण्याची व सिल करण्याची नोटीसाही देवून कर न भरल्याने सोमवारी दुपारी चिपरी ग्रामपंचायतीने 110 केव्हीचे उपकेंद्रातील कंट्रोल रूम, प्रशासकीय कार्यालयाला कुलुप घालून शासकीय सिल केले. या कारवाईमुळे महापारेषणच्या अधिकार्यांनी गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्याकडे धाव घेतली. मात्र करापोटी निम्मी 30 लाख रुपये रक्कम भरल्यानंतर सिल काढण्याचे आश्वासन मिळाले.
सन 2000 पासून चिपरी ग्रामपंचायात व उपकेंद्र वाद होता. अखेर सर्व प्रक्रिया पुर्ण करून चिपरी ग्रामपंचायतीने कर आकारणी केली आहे. सन 2000 पासून ते आजपर्यत 61 लाख 6 हजाराचा कर थकीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कर भरण्याची नोटीस ग्रामपंचायतीकडून देण्यात आली होती. मात्र या उपकेंद्राकडून दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतीने उपकेंद्र सिल करण्याची नोटीस दिली होती. मात्र कर न भरल्याने चिपरी ग्रामपंचायतीने कारवाई केली.
यावर माजी सरपंच सुरेश भाटिया म्हणाले, चिपरी ग्रामपंचायतीचा 61 लाख रुपये कर थकीत असताना ग्रामपंचायतीचा 1 ते 2 महिन्याचे वीज बिल थकीत असले तर आपल्याकडून ते तोडण्यात येते. त्यामुळे तातडीने कर भरल्याशिवाय सिल काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी सरपंच दिपिका परीट, उपसरपंच पांडव, तंटामुक्ती अध्यक्ष रणजित आवळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे, परशराम कांबळे, आनंदी जगदाळे, मोहन पांडव, संजय पांडव, ग्रामविकास अधिकारी सचिन कारकोले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चिपरी हद्दीत असलेल्या महापारेषण ११० के. व्ही. उपकेंद्रचां मागील पंधरा वर्षापासून ६१ लाख ५० हजार रुपये कर थकीत आहे. सोमवारी ग्रामपंचायतने सिल केल्याने मोठीं नाचक्की झाली आहे. त्यामुळें चिपरी ग्रामपंचायतने सील केल्यामुळे लाईट सुरू करू शकत नाही असे सांगून गावागावांमध्ये भांडणे लावत आहेत. ही बाब अतिशय निंदनीय आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा व जनतेला वेठीस धरू नये असा इशारा माजी सरपंच बबन यादव यांनी दिला.
ग्रामपंचायत सातत्याने त्यांच्याशी याबाबत संवाद साधत असताना देखील महापारेषने थकीत करा बद्दल कधीच गांभीर्याने घेतले नाही. याउलट मागील आठवड्यात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे साडेचार लाखाचे थकीत बिलापोटी त्यांनी कोथळी येथून होणाऱ्या गावच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित केली. चार लाख रुपयाचा चेक घेतल्यानंतर चार दिवस बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत झाला महापारेषण ही भूमिका दुटप्पी आहे. असे यादव यांनी सांगितले.

