इचलकरंजी / प्रतिनिधी
वस्त्रनगरीबरोबरच खो-खो ची पंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत २४ ते २७ मार्च या कालावधीत कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळील विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर क्रमांक २१ च्या पटांगणावर सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण ४० संघांचा समावेश असणार आहे. स्पर्धा सकाळी ७ ते १० आणि सायंकाळ ४ ते १० या कालावधीत खेळली जाणार असल्याची माहिती स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासनाच्या वतीने कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सन २०२४-२५ मधील या स्पर्धेचे आयोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाने इचलकरंजीत होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणान आहे. स्पर्धेसाठी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्य पटांगणावर चार मैदाने तयार करून घेण्यात आल आहेत. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिम अडसूळ, सुनील पाटील, शेखर शहा, कोल्हापू जिल्हा खो-खो असोसिएशनचे राजन उरुणकर प्रशांत पोवार, अरुण पाटील, श्रीरंग खवरे, जी. जी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

