कापूस गोदामास आग; ८० लाखांचे नुकसान

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील आसरानगर बस स्टॉप परिसरातील कापूस गोदामास शनिवारी दुपारी आग लागली. शॉर्टसर्किटने आग लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इचलकरंजी महानगरपालिका आणि हातकणंगलेच्या ९ अग्निशमन बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
मणीशंकर केसरवाणी (रा. कोल्हापूर रोड, शाहू पुतळ्याजवळ) यांचे सांगली रोडवर भाड्याच्या इमारतीत कापूस गोदाम आहे. शनिवारी हे गोदाम बंद होते. दुपारी बाराच्या सुमारास गोदामातून धूर निघत असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत माहिती केसरवाणीय यांना दिली.

Scroll to Top