निपाणी / प्रतिनिधी
कन्नड आणि मराठी माध्यमांच्या शाळांप्रमाणेच आमच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा संस्कृती रुजवणे आणि त्यांना स्वावलंबी जीवनासह उद्याचे चांगले नागरिक होण्यासाठी तयार करणे हा आमच्या सीबीएसई शाळेचा उद्देश आहे, असे निपाणी येथील विद्या संवर्धक मंडळाचे संचालक आणि व्हीएसएम सीबीएसई शाळेचे गव्हर्निंग कॉऊंसेलचे सदस्य सचिन हालप्पनवर यांनी सांगितले.
निपाणी येथील व्हीएसएम सीबीएस स्कूलमध्ये आयोजित युकेजी पदवी प्रदान व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पालकांना संबोधित करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमच्या स्कूलचे विद्यार्थ्यांचा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विकास व्हावा, या दृष्टिकोनातून व्हीएसएम संस्थेचे चेअरमन व सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना राबवत आहोत, त्याचे परिणाम आम्हाला आता मिळत असल्याचे सांगितले.
व्हीएसएम सीबीएसई शाळेचे गव्हर्निंग कॉऊंसेलचे अध्यक्ष गणेश खडेद, प्राचार्या डॉ. समीरा बागेवाडी, प्रा. सरोजिनी समाजे यांनीही मनोगत व्यक्त केले. विविध
स्पर्धेतील विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
लहान मुले, मुली त्यांच्या टोप्या हवेत फेकतानाचे दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते. यावेळी पालक व शिक्षक उपस्थित होते. प्रियंका गिंडे यांनी स्वागत केले. नंदिनी पाटील यांनी विद्यार्थांकडून प्रमानवचन स्वीकारले. श्रीदेवी दोड्डगोळ यांनी आभार मानले.

