इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. दीपा पुजारी हिची ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. स्पर्धेसाठी दीपा पुजारी ही रवाना झाली आहे. कु. दीपा पुजारी हिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिला डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, सोनल बाबर व आई-वडीलांचे प्रोत्साहन लाभत आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

