एकरकमी एफआरपी निर्णयामुळे साखर, पेढे वाटून आनंद साजरा

इचलकरंजी / प्रतिनिधी

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय पूर्ववत करण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे महात्मा गांधी पुतळा चौकात साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
२०२२ मध्ये महाविकास आघाडीने तुकड्याने एफआरपी देण्याचा शासन निर्णय घेतला. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले होते. यावेळी शहराध्यक्ष बसगोंडा बिरादार, उपाध्यक्ष आण्णासाहेब शहापुरे, कार्याध्यक्ष सतीश मगदूम, संजय बेडक्याळे, बाळगोंडा पाटील, विष्णू साळुंखे, अविनाश कोरे, हेमंत वणकुद्रे, रामा शेळके आदी होते.

Scroll to Top