टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथे भरधाव कारचा भीषण अपघात

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापुरात मध्यरात्री एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. शहरातल्या टेंबलाईवाडी उड्डाणपूल इथं मध्यरात्री 2 वाजता ही घटना घडली. यामध्ये (55 वर्षीय) धिरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

अतिशय वेगानं बीएसएनएल टॉवर कडून टाकाळाकडे जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात घडला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलं नसलं तरी कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद झाली आहे. एकीकडे या अपघाताची चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मात्र या संपूर्ण घटनेचे दोन सीसीटीव्ही समोर आलेत. ज्यामुळे आणखी एका गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे मार्गावरील भटक्या कुत्र्यांची. इथल्या भटक्या कुत्र्यांना या अपघाताची आधीच चाहूल लागली होती अशा अनेक चर्चा सोशल मीडियाकर सुरू असून सीसीटीव्हीमध्ये सुद्धा हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Scroll to Top