होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे.हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. याव्यतिरिक्त, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो.
होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे (देशांतरित जनसमूह)आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे.
होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतु कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते, हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी (पौर्णिमेचा दिवस) चालू होतो, जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगाचा सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत.होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात.
ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”,आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळीनंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते.एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे. होळी हा रंगाचा सण आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात. विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्ये यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात.
भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात.महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो.सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात.
वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .
