शहापुरात भ. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या स्लॅबचा शुभारंभ

इचलकंजी/ प्रतिनिधी श्री १००८ भ. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट (शहापूर, इचलकरंजी) येथे मंदिराच्या मानस्तंभ शीलान्यासचा पाया खुदाई व पायाभरणी मुहूर्त, नूतन मंदिराच्या प्रथम स्लॅबचा मुहूर्त विधिवत झाला. शांतिनाथ भगवंतांचे पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा झाला. या मानस्तंभ शीलान्यास, पायाखुदाई विधी श्रीमती हौसाबाई जिन्नाप्पा मोळेकर श्री. व सौ. शांता महावीर मोळेकर यांच्या वतीने करण्यात आला तसेच इतर सर्व होमहवन, व मानस्तंभ पायाभरणी इंद्र म्हणून श्री. व सौ. त्रिशला सचिन अथणी, श्री. व सौ. अर्चना विशाल बम्मन्नावर, श्री. व सौ. स्नेहल शितल बोरगावे, श्री. व सौ. सुनीता राजेंद्र बम्मन्नावर यांच्या हस्ते झाले. नूतन मंदिराच्या स्लॅबचा शुभारंभप्रसंगी कुंथीलाल पाटणी, चंद्रकांत पाटील, संजय पाटणी, दिलीप चौगुले, शेषराज पाटणी, रमेश पाटील, सचिन राणे, किसन शिंदे, रणजीत अनुसे, संजय मगदूम, विजय गिरमल, सुकुमार पोते, पांडुरंग सोलगे, बाहुबली पाटील, अशोक चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रकाश चौगुले, शितल पाटील, सांगले गुरुजी, शांतिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल बम्मन्नावर, सेक्रेटरी अनंत बोरगावे, खजिनदार मोहन बोरगावे, संजय कांचनकोटी, सुमित बोरगावे, अविनाश पाटील, सागर बोरगावे, इंदुमती कुडचे, शशिकला व्हनवाडे, अरुण बम्मन्नावर, स्वप्निल बोरगावे, अजित बोरगावे, शिवराज पाटील, श्रीकांत काणे, दयानंद काणे, आकाश अथने, अभिषेक बम्मन्नावर, अनिल मुरगुंडे, पृथ्वीराज बम्मन्नावर, भारत मोळेकर, दीपा मुरगुडे, रमेश बम्मन्नावर, महावीर बुगटे, गांधीलाल बोरगावे, विशाल काणे, आप्पासो मोळेकर, भालचंद्र मोळेकर, राकेश पाटील, संजय टोणे, जगन्नाथ कांचनकोटी, राजश्री बोरगावे, श्रीलेखा पाटील, नंदा मुके, आंबिका पाटील, प्रियंका बम्मन्नावर, मेघा कांचनकोटी, शुभांगी सांगले यांच्यासह जैन समाजातील श्रावक-श्राविका उपस्थित होते.
Scroll to Top