छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन शंभूराजे बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम

कोल्हापूर / प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज बलिदानदिनानिमित्त विविध संस्था-संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापालिकेतर्फे त्यांच्या रुईकर कॉलनी येथील पुतळ्यास सहा. आयुक्त स्वाती दुधाणे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपशहर अभियंत रमेश कांबळे, तुषार भरसट, अरुण जमादार, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने रुईकर कॉलनी येथील छत्रपती शंभूराजे स्मारक परिसरातील छत्रपती शंभूराजेंच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्मारक परिसरात वातानुकूलित मंडपात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर हॉस्पिटल) रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. यात ८५ व्यक्तींनी रक्तदान केले. सर्वांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, संदीप पाडळकर, प्रवीण कुरणे, रणजित सुतार व सहकाऱ्यांनी केले. शिवबाचा मावळा संघटना शिवबाचा मावळा संघटनेतर्फे पापाची तिकटी स्मारकाजवळ अभिवादन केले. यावेळी पोवाडा गायन झाले. यावेळी अॅड. अमोल माने, जयदीप सरवदे, विनोद जाधव, आसिफ शेख, चंद्रकांत पाटील, गणेश मोरे, दत्तात्रय कोथमिरे आदी उपस्थित होते.
युवा सेना युवा सेना कोल्हापूरच्या वतीने पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी शंभूराजेंचा स्फूर्तीदायी इतिहास सांगितला. यावेळी किशोर घाटगे, प्रसाद चव्हाण, कुणाल शिंदे, अॅड. मंदार पाटील, सौ. तेजस्विनी घाटगे, मंगेश चितारे, मेघराज लुगारे, सिद्धेश देसाई, अभिषेक मंडलिक, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने करवीर नगर वाचन मंदिरासमोरील हनुमान मंदिर पारावर रक्तदान शिविर झाले. यात १७० रक्त दात्यांनी रक्तदान केले. शहर कार्यवाह आशिष लोखंडे, आदित्य जमदाडे, रोहित अतिग्रे, आशिष पाटील, अवधूत चौगुले, स्वप्निल शिंदे, अनिकेत पाटील, पार्थ देवर्डे, ओमकार डिगे, गणेश अतिग्रे आदी धारकऱ्यांनी संयोजन केले.

Scroll to Top