वर्षभर पगार न दिल्याने जिल्हा परिषदेसमोर उपोषण

कोल्हापूर / प्रतिनिधी

गडमुडशिंगी (ता. करवीर) ग्रामपंचायतीमधील कर्मचारी अविनाश पांडुरंग कांबळे यांनी ग्रामपंचायतीने पगार न दिल्याबद्दल सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत आकृतिबंध कर्मचारी ग्हणून गेली १७वर्षे क्लार्क पदावर कार्यरत असून ग्रामपंचायत गडमुडशिंगीचे ग्राम अधिकारी रोहिदास चौगले व सरपंच अश्विनी शिरगावे यांनी गेल्या वर्षभरापासून पगार दिलेला नाही. तसेच हजेरी पत्रक उपलब्ध करून देत नसल्यामुळे कामावर असूनही गैरहजेरी पडत आहे, असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Scroll to Top