हौसाबाई कॉलेजतर्फे इ. १०वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

जयसिंगपूर / प्रतिनिधी

निमशिरगाव येथील हौसाबाई मगदूम ज्युनियर कॉलेजने सध्या १०वी बोर्ड परिक्षा विद्यार्थ्यांसाठी ७ दिवशीय जीईई आणि नीट (एनईईटी) ओरिएंटेशन व करिअर मार्गदर्शन जाहीर केला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक दिशा ठरवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक तेजस मगदूम यांनी दिली.
सदरचा उपक्रम २१ मार्च ते २९ मार्च या कालावधीत होणारा हा कार्यक्रम संयुक्त प्रवेश परीक्षा (जीईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (एनईईटी) देऊ इच्छिणाऱ्या इ. १०वी विद्यार्थ्यांसाठी खास आखला आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जीईई आणि एनईईटी च्या अभ्यासक्रमाची सखोल माहिती, तसेच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप व गुणांकन पद्धतीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. अनुभवी शिक्षक आणि विषयतज्ज्ञ या सत्रांचे नेतृत्व करणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ठोस तयारी करण्याचे तंत्र शिकविले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मोफत बससेवा विविध ठिकाणांहून उपलब्ध करून देण्यात आली आहे. १० वी बोर्ड परिक्षेचे विद्यार्थी या उपक्रमासाठी १७ मार्चपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Scroll to Top