इचलकरंजी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्हा कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत पुरुष गटातील ३० आणि महिला गटातील ८ संघ सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी शिवशाहू चिखली आणि शाहू सडोली या संघांनी विजयी सलामी दिली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कै. बावचकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी आ. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पूजन झाले. सतीश डाळ्या, शंकर पोवार, अमित कागले, शशांक बावचकर, दिलीप ढोकळे, जयवंत लायकर, प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील आदींसह क्रीडारसिक उपस्थित होते.
