जलस्वराज्य प्रकल्पाच्या वाहिनीला लागली गळती

कबनूर / प्रतिनिधी

येथील रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात जलस्वराज्य प्रकल्पाची जलवाहिनी तुटून गळती लागली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जमिनीच्या खालून वायरिंग टाकण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदाई केल्याने मुख्य चौक रस्त्यावर पाणीच पाणी पसरले होते. परिणामी इम्रान पान शॉप समोर दलदल निर्माण झाली आहे. तसेच शुद्धीकरण केलेले हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून चौकातील व रस्त्यास अडथळा ठरणारे विद्युत खांब व तारा काढून जमिनी खालून वायरिंग करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, जलस्वराज्य प्रकल्पाची जलवाहिनी तुटून गळती लागली आहे.
या जलवाहिनीमधून पाणी सुरू झाल्यानंतर खड्ड्याच्या ठिकाणी पाण्याचा डोह तयार होत आहे. त्यामुळे जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Scroll to Top