निपाणी/ प्रतिनिधी
येथील रथोत्सव मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महादेव गल्ली महादेव मंदिरातील श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला. महादेव मंदिर ते रविवार पेठ, गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ मार्गे विरूपाक्षलिंग देवस्थान येथे जाऊन मूर्तीची अभिषेक पूजा आरती करण्यात आली.
त्यानंतर पुन्हा पालखी महादेव मंदिर येथे आणण्यात आली. पालखीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, रवि कोठीवाले यांच्यासह महादेव मंदिर उत्सव कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवार ता.४ रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले असून याचा लाभघ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
