हातकणंगले प्राथमिक शिक्षक समितीस आश्वासन
हातकणंगले /प्रतिनिधी
येथील राजगोपालाचारी शिक्षक पत संस्थेस शाखेस आम . अशोकराव माने यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी हातकणंगले प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आम . माने यांचा सत्कार करण्यात आला. समितीमार्फत शिक्षक व बालकांचे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले . यामध्ये मुख्यालयात राहण्यासह नवीन आलेल्या संच मान्यता जीआर याविषयी चर्चा करण्यात आले . दोन्ही विषय शिक्षण मंत्र्यांना भेटून सोडविण्याचे आश्वासन आम . माने यांनी यावेळी दिले.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष संजय कुंभार यांनी केले. तसेच सर्व संचालक मंडळ , शिक्षक समितीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व कर्मचारी यांची ओळख करून दिली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष , शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अर्जुन पाटील सर यांनी आम . माने यांचा सत्कार केला. राजगोपालाचारी संस्थेचे चेअरमन व तालुकाध्यक्ष सचिन कोल्हापुरे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मारुती पाटील , शिक्षक नेते आनंदा गवळी, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व आजी – माजी संघटना पदाधिकारी ,चेअरमन , व्हा. चेअरमन व शिक्षक उपस्थित होते .
फोटो –
हातकणंगले -येथील राजगोपालाचारी शिक्षक पत संस्थेच्या वतीने आम . अशोकराव माने यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर
