कोल्हापूर/ प्रतिनिधी
नागाळा पार्क येथील मोहिम ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जेईई २०२५ परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या निकालात आयुष रायगांधी ९९.९६ः पायल मानेः ९८.०५ पर्सेटाईल गुणांसह यश मिळवले आहे. याबरोबरच आरुष देसाई, इशान कुलकर्णी, तनिष्का घेवारी, अंशुल टेंबे, विश्वराज शिंदे यांनी देखील उज्ज्वल यश मिळवले.
मोहिम ॲकॅडमी २०२७ पासून कार्यरत असून आजवर संस्थेच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी आणि एम्ससारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळाला आहे. संस्थेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मक स्पष्टता विकसित करणे आणि कठीण समस्यांचे आकलन करण्याची क्षमता निर्माण करणे आहे. संस्थापक अभिषेक नागदेव आणि अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन मिळत आहे.
