महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापुरात रुद्राक्ष प्रदर्शन व विक्री

कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

हैदराबाद येथील इंडस नेपाळ रुद्राक्ष संस्थेच्या वतीने २० ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान स्टेशन रोडवरील हॉटेल रेडियंट येथे रुद्राक्ष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात १ मुखी ते २१ मुखी रुद्राक्ष उपलब्ध असतील.
संस्थेचे संचालक नरेंद्र काशीरेड्डी यांनी सांगितले की, जन्मतारखेनुसार वेदगणित शास्त्रावर आधारित रुद्राक्षही येथे मिळू शकतील. तसेच, रुद्राक्ष नकली असल्यास विक्री रकमेच्या दुप्पट परतफेड केली जाईल. सिद्धमाळा, जपमाळा, स्पटिकमाळा, तुळशीमाळा, शाळीग्राम यासारख्या विविध माळांचाही समावेश आहे. शिवपुराणानुसार रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते, त्यामुळे ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Scroll to Top