पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मोहीम

कोल्हापूर/ प्रतिनिधी

केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा माहे डिसेंबर २०२४ तेमार्च २०२५ या कालावधीतील १९ वा हप्ता ता. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरीत करण्यात येणार असून विविध त्रुटीपुर्तता अभावी सुमारे ३३ हजार ३८३ लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
यासाठी जिल्ह्यात ता. २१ फेब्रुवारी पर्यंत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती, आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ई-केवायसी प्रमाणीकरणाचे ७ हजार ५१५ प्रलंबित लाभार्थी असून यासाठी
लाभार्थ्यांनी पी.एम. किसान मोबाईल ॲपमधून चेहरा स्कॅन करावा किंवा अंगठा स्कॅन करुन बायोमेट्रिक पध्दतीने ई-केवायसी करावे. यासाठी महा ई सेवा केंद्र किंवा गावच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा.
नव्याने नोंदणी करण्यासाठी ३४५ प्रलंबित लाभार्थी असून यासाठी अलीकडचा ७/१२, फेरफार, पती-पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असल्यास फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीनधारणा असलेला फेरफार पोर्टलवर अपलोड करावा. यासाठी महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा. बँक आधार सिंडींगसाठी ११ हजार २३ प्रलंबित लाभार्थी असून यासाठी बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात असलेले खाते उघडावे. यासाठी बँक
शाखा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या ते पाचव्या हप्त्याच्यावेळी लाभ अदा न होऊ शकलेले ११ हजार ८६१ लाभार्थी असून यासाठी बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात असलेले खाते उघडावे. यासाठी बँक शाखा/पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होणार आहे. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी ता. २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमे दरम्यान करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

Scroll to Top