रुईत मंगळवारपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

रुई/ प्रतिनिधी

संग्रहीत छायाचित्र

रुई (ता. हातकणंगले) येथील जय हनुमान भजनी मंडळ यांच्या वतीने ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे मंगळवार ता. १८ ते ता. २५ फेब्रुवारीपर्यंत श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने निमंत्रण पत्रिका व पावती पूजन गावातील प्रमुख मान्यवर व वारकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी या सप्ताहामध्ये कीर्तन, प्रवचन तसेच दररोज गावातील काही अन्नदातांकडून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष प्रकाश आंबी यांनी दिली. यावेळी सरपंच शकिला कोन्नूर, कृष्णात सावंत, राजाराम शिंदे, अभय काश्मीरे, संजय मगदूम, राजाराम झपाटे, जयसिंग शिंदे, भाऊसाहेब फास्के, बाबासाहेब हुपरे यांच्यासह महिला वारकरी उपस्थित होते.

Scroll to Top