कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
राज्य सरकार १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत राज्यभरात बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी यांनी दिली. याबाबतचे पत्र कोल्हापूर बोर्डच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.
शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा १० ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला. त्याचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढला; परंतु चार महिने झाले, तरी अद्याप यासंदर्भात कोणत्याही हालचाली शासनस्तरावर दिसत नाहीत.
हिवाळी अधिवेशनात याचा निधी मंजूर होणे आवश्यक होते; परंतु राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम राहणार असल्याचे माळी यांनी सांगितले.
