एस.टी. च्या धडकेत बारडवाडीतील एक जखमी

कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

मुदाळतिट्टा ते बिद्री या मार्गावर रस्ता ओलांडत असताना एस.टी. ने धडक दिल्याने एकजण जखमी झाला. शिवाजी नाना मुसळे (रा. बारडवाडी, ता. राधानगरी) असे त्यांचे नाव आहे. ११ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. गुरुवारी (दि. १३) उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Scroll to Top