इचलकरंजी / प्रतिनिधी

संग्रहित चित्र
इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरात मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास गारमेंट कारखान्याला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये गारमेंटमधील तयार माल व अन्य साहित्य जळून खाक – झाल्याने सुमारे ४ कोटी – रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त – केला जात आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे समजते. याबाबतची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.
गौतमकुमार पुरोहित यांच्या गारमेंट कारखान्यास अचानक आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते. तब्बल ६ तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
