हातकणंगले / प्रतिनिधी
येथील नगरपंचायत हातकणंगले हातकणंगले यांच्यामार्फत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री रामराव इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेमध्ये नऊ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यामध्ये लहान गट-तनिष्क तेजस-प्रथम, ईश्वरी पाटील द्वितीय, साक्षी नागराळे तृतीय, साईराज पाटील-उत्तेजनार्थ, तर मोठा गट – वेदिका सुतार-प्रथम, साक्षी पांडव-द्वितीय, समृद्धी कदम-तृतीय, निलेश खरात व भार्गव आवळे उत्तेजनार्थ. सदर विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीकडून सन्मानपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता पाटील, सुकुमार देवकाते, बी.आर.सी हातकणंगलेच्या विशेष शिक्षिका रुपाली भोसले, सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सागर कुंभार यांनी केले.
