हेरले/प्रतिनिधी
येथील कोल्हापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस हवालदार बाबासाहेब नाना कोळेकर यांना जीवरक्षक राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. श्री. कोळेकर यांनी केवळ वाहतूक व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य केले नाही, तर समाजाशी बांधिलकी जपत अनेक नागरिकांचे प्राण वाचवण्याचे मोलाचे कार्यही केले आहे. शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. कोळेकर म्हणाले, कर्तव्य बजावत असताना समाजसेवा करण्याची संधी मिळते हे माझे भाग्य आहे. हा सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे आणि भविष्यातही मी जनसेवेचे कार्य अशीच निष्ठेने पार पाडत राहीन.
