बांधकाम कामगाराची आत्महत्या

कोल्हापूर / प्रतिनिधी


भोसलेवाडी, महादेव मंदिराजवळ येथील बांधकाम कामगार किरण कृष्णात कणसे (वय ४७) यांनी घरात लाकडी तुळईला बेडशिटने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. ६) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच गळफास सोडवून नातेवाइकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Scroll to Top