तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची मागणी

धाराशिव / प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिरात प्रेवश करताना भाविकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून यावे, असा निर्णय मंदिराच्या व्यवस्थापनाने घेतला. धार्मिकस्थळांना भेट देताना आपल्या संस्कृतीचे पालन व्हावे, हा हेतू असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तुळजाभवानीच्या मंदिरातही भाविकांसाठी ड्रेस कोड लागू कारावा, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात आली.

Scroll to Top