महाकुंभात वसंत पंचमीचे तिसरे अमृत स्नानाला सुरूवात

महाकुंभात आज (सोमवार) तिसरे अमृत स्नान होत आहे. वसंत पंचमीच्या अमृत स्नानाला महाकुंभात सुरुवात झाली आहे. कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. वसंत पंचमीनिमित्त संपन्न होणाऱ्या तिसऱ्या अमृत स्‍नानाला विशेष महत्‍व आहे. महाकुंभात आज सर्वप्रथम नागा साधूंनी डुबकी घेतली. प्रथम नागा साधू, नंतर महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्याने संगमात डुबकी घेतली आहे.

दरम्‍यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑपरेशन इलेव्हन चालवून गर्दी व्यवस्थापन विशेष योजनेअंतर्गत व्यवस्था केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी एकेरी मार्ग तयार करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

महाकुंभातील वसंत पंचमीनिमित्त, संन्यासी, बैरागी आणि उदासी गटांचे आखाडे पूर्व-निर्धारित क्रमाने संगमात पवित्र स्नान करत आहेत, ज्यामध्ये पहिल्या गटाने आधीच गंगेच्या पवित्र संगमात स्नान केले आहे, यमुना आणि पौराणिक सरस्वती. आतापर्यंत, ३३ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले आहे आणि उत्तर प्रदेश सरकारला सोमवारी सुमारे पाच कोटी यात्रेकरू येण्याची अपेक्षा आहे.

या शिवाय पुलावरून मेळाव्यात येणाऱ्या भाविकांना कोणत्‍याही प्रकारचा त्रास होउ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आल आहे. तसेच त्रिवेणी घाटांवर अधिक भाविकांचा अधिक दबाव रोखण्यासाठी अतिरिक्‍त पोलिसांची फौजफाटा लावण्यात आला आहे. या ठिकाणी वरीष्‍ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी अतिरिक्‍त बॅरिकेटींगही लावण्यात आले आहेत.

महाकुंभात तिसऱ्या अमृत स्‍नानासाठी मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी दिलेल्‍या निर्देशावरून प्रशासनाने विर्शेष तयारी केली आहे. महाकुंभात येणाऱ्या अनेक मार्गांवर जाण्यासाठी प्रशासनाने भाविकांसाठी माहिती शेअर केली आहे.

Scroll to Top