श्रीनगर / प्रतिनिधी
जोरदार बर्फवृष्टी आणि घसरलेल्या तापमानामुळे सोमवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठाने निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नवीन तारखा येत्या काही दिवसांत जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठ प्रवक्त्याने निवेदनात सांगितले. काश्मीरमध्ये शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे खोऱ्यातील काही भागांशी संपर्क तुटला आहे. मुख्य महामार्ग आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून बर्फ हटवण्यात आले असले तरी, केंद्रशासित प्रदेशातील काही दुर्गम भागांत अद्यापही बर्फ हटवण्याचे काम सुरू होते.