भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहर कार्यालय येथे सभासद नोंदणी अभियान या संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
या कार्यशाळेमध्ये प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक बूथ मध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. या अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सरकारने घेतलेली निर्णय पोचण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यशाळेला मा. आम. प्रकाश आवाडे, शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले, कार्यशाळेचे प्रभारी विजय भोजे सर, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेचे संयोजक शशिकांत मोहिते, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू, अशोक स्वामी पांडुरंग म्हातुगडे, महिला अध्यक्षा सौ. अश्विनीताई कुबडगे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते अहमद मुजावर, सौ. उर्मीला गायकवाड, तसेच बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.