जयसिंगपूर येथे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा २३ आणि २४ डिसेंबर रोजी होत आहे. शहरातील बाराव्या गल्लीतील माजी नगरसेवक बबनराव हतळगे यांच्या निवास स्थानासमोर मंडपात श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
सोमवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता पालखीचे मंडपात आगमन होईल. त्यानंतर दोन दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी बारा व रात्री आठ वाजता श्रींची आरती होईल. मंगळवारी (ता. २४) पहाटे स्वामींची काकड आरती व सामूहिक अभिषेक तसेच दुपारी बारा वाजता व रात्री आठ वाजता श्रींची आरती होईल. बुधवारी (ता. २५) पहाटेचार वाजता सामूहिक अभिषेक व काकड आरती झाल्यानंतर सकाळी दहा वाजता पालखीचे प्रयाण होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बबनराव हातळगे यांनी केले आहे.