आळते, हातकणंगले परिसरात कडकडीत बंद

हातकणंगले/प्रतिनिधी

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ व पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधीतावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी आळते हातकणंगले परिसरात बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी व व्यवसाईकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन चांगला प्रतिसाद दिला.

युवकास मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून सूर्यवंशीच्या कुटुंबास पन्नास लाखाची मदत
परभणीतील घटनेच्या निषेधार्थ पोलीसांना निवेदन देताना शिरीष थोरात विलास कांबळे, प्रविण जनगोंडा यांच्यासह अन्य पदाधिकारी.
शासनाने जाहिर करावी व मयताच्या कुटूंबातील सदस्यास शासकीय नोकरीत घ्यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले तहसिलदार व पोलीसांना दिले. तत्पूर्वी हातकणंगले पोलीस ठाणे व तहसिलदार कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. निवेदन देणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांत शिरीष थोरात, विलास कांबळे, संतोष कांबळे, संजय कांबळे, सुरेश आळतेकर, प्रविण जनगोंडा, सद्दाम मुजावर आदि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Scroll to Top