उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू : आमदार अशोकराव माने

कोल्हापूरच्या उद्योग वाढीसाठी व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी विधान सभेत प्रयत्न करू असे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी मत व्यक्त केले.ते शिरोली औद्योगिक वसाहतीतील फौंड्री अँड इंजीनियरिंग क्लस्टरच्यावतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी शिरोली मॅन्युफॅक्‍चरींग असोसिएशन (स्मॅकचे ) जेष्ठ संचालक सुरेंद्र जैन हे होते. आमदार माने पुढे बोलताना म्हणाले, फौन्ड्री क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास होण्यास मदत झाली आहे. पण शासनाचे काही जाचक नियम व अटीमुळे उद्योजकांना जमीन संपादन, खरेदी, वीज दरवाढ, अनुदान अशा अनेक समस्यां उद्योजकासमोर आहेत. त्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. नूतन आमदार डॉ. अशोकराव माने यांचा सत्कार करताना उद्योजक सुरेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आला.

स्नॅकचे जेष्ठ संचालक सुरेंद्र जैन बोलताना म्हणाले, कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रातील जेष्‍ठ व्यक्‍तिमत्‍व असलेले डॉ. अशोकराव माने हे आता आमदार झाले आहेत. येथील उद्योग वाढीसाठी शासन दरबारी ते प्रयत्नशील राहतील. भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. अशी अपेक्षा व्यक्त करुन उद्योजक त्यांच्या नेहमी पाठीशी राहतील अशी ग्वाही जैन यांनी दिली .

याप्रसंगी स्‍मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, संचालक सुरेश चौगुले, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, क्लस्टरचे अध्यक्ष दिपक चोरगे, हरिश्चंद्र धोत्रे, नितीन दलवाई, विजय चौगले आदी उपस्थित होते. गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Scroll to Top