२० डिसेंबरपासून पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन

इचलकरंजी/प्रतिनिधी

बालरंगभूमी परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर २८ शाखांच्या माध्यमातून होत असून या शाखांचे कार्य व बालकलावंतांना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन दि. २० ते २२ डिसेंबर दरम्यान पुणे येथे आयोजन करण्यात येणार असल्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के – सामंत यांनी सांगितले. बालरंगभूमी संमेलनाध्यक्षपदी सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी यांचे नाव निश्चित झाले असून, संम `लनाचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, अजित भुरे, अभिनेते व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सविता मालपेकर, सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवरांची  प्रमुख उपस्थिती असणार आहे.

इचलकरंजी बालरंगभूमी परिषदेच्या वतीने बालकलाकारांचा संगीत नाट्य प्रवेश, नांदी, पिंगळा लोककला, कथ्थक नृत्य, असे कलाप्रकार सादर करणेत येणार असुन या कलाप्रकारांची तयारी बालचमुंकडुन सौ. गौरी पाटील, प्रा. मिलिंद दांडेकर, सौ. सायली होगाडे, करुन घेत आहेत. इचलकरंजीच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे सादरीकरण हे बालकलाकार करतील असे प्रतिपादन अध्यक्ष मनिष आपटे, उपाध्यक्ष संजय सातपुते यांनी केले. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष मनिष आपटे, उपाध्यक्ष संजय सातपुते, कार्याध्यक्षा गौरी पाटील, सचीव श्रीपाद कुलकर्णी, कार्यवाह सचीन चौधरी, कोषाध्यक्ष प्रशांत चाळके, सहकार्यवाह संजय कांबळे, रेश्मा कोंडेकर, प्रसिध्दी प्रमुख प्रदिप कांबळे, लक्ष्मण पाटील तसेच शाखेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थीत होते.

Scroll to Top